वीकली एक्सपायरी दिवशी बाजारात अस्थिर वातावरण पाहायला मिळाले. शेवटी सेन्सेक्स 230 अंकांनी तर निफ्टी 66 अंकांनी घसरून बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँकेच्या 3 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला.
मात्र, इंट्रा-डेमध्ये निफ्टी बँकेने विक्रमी उच्चांक गाठला. शुक्रवारी पीएसयू बँक आणि इन्फ्रा शेअर्समध्ये खरेदी झाली. दुसरीकडे, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये विक्री झाली. तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक फ्लॅट राहिले. फार्मा, रियल्टी आणि एनर्जी इंडेक्स लाल चिन्हात बंद झाले. (pre analysis of share market 18 November 2022 )निफ्टी बँक 77 अंकांनी घसरून 42458 वर बंद झाला. तर मिडकॅप 126 अंकांनी घसरून 31072 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 22 शेअर्समध्ये दबाव दिसून आला. तर निफ्टीचे0 पैकी 35 शेअर्स घसरले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 7 शेअर्सवर दबाव दिसून आला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?तांत्रिक दृष्टिकोनातून निफ्टीने इंट्राडे चार्टवर लोअर टॉप फॉर्मेशन तयार केले आहे, जे मोठ्या प्रमाणात नकारात्मक संकेत देत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. पण बाजाराचा मीडियम टर्म ट्रेंड अजूनही तेजीचा दिसत आहे. या वेळी बुल्ससाठी पहिला रझिस्टंस 18400/62000 वर दिसतो. हा रझिस्टंस वरच्या बाजूने तुटल्यास,तेजी येऊ शकते आणि आपल्याला 18500-18535/62300-62500 पातळी दिसू शकते. दुसरीकडे, बाजार या पातळीच्या खाली घसरला तर ही घसरण आणखी वाढू शकते. अशा परिस्थितीत कॉन्ट्रा ट्रेडर्स 18200/61200 च्या आसपास 18150/61000 च्या सपोर्ट स्टॉपलॉससह खरेदी करू शकतात.
निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली आणि दिवसभर चढ-खाली होत राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. डेली चार्टवरील आरएसआय (14) इंडिकेटर बियरिश करेक्शनच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. भविष्यात निफ्टी 18300 च्या खाली घसरला तर ही घसरण 18100-18000 पर्यंत वाढू शकते. त्याच वेळी, वरच्या बाजूने निफ्टीसाठी 18450 वर रझिस्टंस दिसत आहे.आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)एल अँड टी (LT)पॉवरग्रीड (POWERGRID)एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)फेडरल बँक (FEDERALBNK)आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)ऍक्सिस बँक (AXISBANK)बँक ऑफ बडोदा (BANKBARODA)पीएनबी (PNB)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.