पिंपरी, पुणे (दि. १२ सप्टेंबर २०२२) शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते पि. के. महाजन यांची अखिल भारतीय समता परिषदेच्या पिंपरी चिंचवड महानगर कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते महाजन यांना नुकतेच मुंबई येथील बैठकीत नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रदेश महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, शहर अध्यक्ष चंद्रशेखर भुजबळ आदी उपस्थित होते. पि. के. तथा पांडुरंग कुमा महाजन हे पिंपरी चिंचवड टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशन, खान्देश माळी मंडळा सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांचे शिक्षण, प्रबोधन करून त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि सर्व समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
For the reason that the admin of this web site
is working, no hesitation very soon it will be well-known, due to its feature contents.
Undeniably believe that which you said. Your favorite reason seemed to
be on the net the easiest thing to be aware of. I say
to you, I definitely get irked while people think about worries that they plainly don’t know about.
You managed to hit the nail upon the top as well
as defined out the whole thing without having side
effect , people can take a signal. Will likely be back to get more.
Thanks