• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, May 15, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

आमदार महेश लांडगे यांच्यामुळे सरसकट शास्तीकर मुक्ती!

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 6, 2024
in आपले शहर
0
आमदार महेश लांडगे यांच्यामुळे सरसकट शास्तीकर मुक्ती!
0
SHARES
9
VIEWS

पिंपरी । प्रतिनिधीराष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची केंद्रात, राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता असताना आम्ही शास्तीकर आणि साडेबारा टक्के परताव्याच्या प्रश्नासाठी मोठा पाठपुरावा केला. पण, खऱ्या अर्थाने भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या मानगुटीवरून शास्तीकराचे भूत उतरवण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केले, असे गौरोवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांनी काढले. तसेच, गेल्या १० वर्षांत खऱ्या अर्थाने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम महेश लांडगे यांनी केले, असा दावाही बहल यांनी केला आहे.भाजपा- शिवसेना- एनसीपी- आरपीआय महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी योगेश बहल बोलत होते.यावेळी महायुतीचे समन्वयक श्री. विजय फुगे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट, माजी महापौर तथा भोसरी विधानसभा समन्वयक मंगला कदम, माजी नगरसेवक पंडित गवळी, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे, संघटक सचिव प्रकाश सोमवंशी, उपाध्यक्ष संदिपान झोंबाडे, ज्ञानेश्वर कांबळे तसेच कुशाग्र कदम, सचिन आवटे, संजय आहेर, कांता मुंडे, प्रदीप आवटे, सचिन दुधाळ, मनीषा गटकळ, कविता गराडे, विनोद वरखडे, श्रीकांत कदम, ज्योती गोफणे, रमेश गुंड, गंगा धेंडे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध सेलचे महायुती तसेच शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी योगेश बहल पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा शास्तीकराचा प्रश्न सोडवण्यासाठी या शहरातील तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महापौर या नात्याने मी देखील अनेक वेळा सरकार दरबारी खेटे घातले. केंद्रात, राज्यात आमची सत्ता होती. मात्र प्रामाणिकपणे कबुली दिली पाहिजे की आमच्या पाठपुराव्यानंतरही शास्तीकराचा प्रश्न सुटला नाही. मात्र, हा प्रश्न आमदार महेश लांडगे यांनी वेळोवेळी पाठपुरावा घेऊन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सोडवला. या शहरातील शास्तीकराचे भूत आपल्या मानगुटीवरून उतरवले. विविध कामांसाठी या शहरातील जमिनी संपादित केल्या. त्या भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम महेश लांडगे यांनी केले त्यांनी साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्नही मार्गी लावला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम गेल्या दहा वर्षात महेश लांडगे यांनी केले आहे.***महायुतीचे एकजुटीने काम करा : माजी महापौर मंगला कदममंगला कदम म्हणाल्या की, घरामध्ये जसे आपण वडीलधाऱ्या व्यक्तींचे ऐकतो. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आचरणात आणतो. तसेच पक्षातील श्रेष्ठ, ज्येष्ठ पदाधिकारी, आपले नेते यांचे आपण ऐकले पाहिजे. कारण आपण पक्ष संघटना म्हणून काम करत असतो. त्यामुळे आपल्या पक्षातील आपले नेते अजित पवार यांनी एखादी गोष्ट ठरवली आहे. तर त्यांच्या निर्णयाशी सहमत राहून पुढे चालत राहणे हे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचे काम आहे. म्हणून आपण महेश लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आहे. महेश लांडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मिळणारे ‘लीड’ हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे अजित पवार यांच्यावरील प्रेम व्यक्त करणार आहे. आपली निष्ठा यातूनच कळणार आहे. म्हणून आपल्याला महायुतीचे काम करायचे आहे.**आमदारांच्या हॅट्रिकमध्ये राष्ट्रवादीचे योगदान असेल : पंडित गवळीमहेश लांडगे यंदा हॅट्रिक करणार याबद्दल कोणीही दुमत बाळगण्याचे कारणच नाही. त्यांचे काम ही त्यांच्या यशाची पोचपावती ठरणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे असेल याची ग्वाही मी देतो. जात, धर्म, माणूस, पक्ष या पलीकडे जाऊन काम करणे हे एकमेव ध्येय महेश लांडगे यांचे आहे. महायुतीचा धर्म पाळून आपल्याला काम करायचे आहे. आगामी काळात अजित पवार यांना पाठिंबा व त्यांना बळ देण्यासाठी महेश लांडगे यांना या मतदारसंघातून विधिमंडळापर्यंत पोहोचवण्याचे काम नव्हे आपली जबाबदारी आहे आणि ती आपण सक्षमपणे पार पाडायचे आहे. विविध सेल, आघाड्या आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महेश लांडगे यांना भरघोस मतांचे लीड मिळवून देण्याचे काम आपले आहे राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष म्हणून आपली ती जबाबदारी असणार आहे.

Views: 129
Previous Post

राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या जाहीरनाम्याचे बुधवारी प्रकाशन  

Next Post

पिंपरी चिंचवडच्या आमदारांनी महापालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले

Related Posts

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
Next Post
पिंपरी चिंचवडच्या आमदारांनी महापालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले

पिंपरी चिंचवडच्या आमदारांनी महापालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!