• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, May 15, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

आरपीआय आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह अनेकांनी घेतली आ. अण्णा बनसोडे यांच्यासाठी माघार

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 4, 2024
in आपले शहर
0
आरपीआय आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह अनेकांनी घेतली आ. अण्णा बनसोडे यांच्यासाठी माघार
0
SHARES
6
VIEWS

युतीधर्म पाळण्यासाठी सर्व मित्र पक्ष सज्ज – योगेश बहल यांची माहिती

पिंपरी, पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२४) महायुतीचा धर्म पाळण्यासाठी सर्व मित्र पक्ष सज्ज आहेत. पिंपरी विधानसभेतून अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या अनेकांनी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली. सोमवारी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे, भाजपचे नेते व समन्वयक सदाशिव खाडे, आरपीआय आठवले गटाचे नेते परशुराम वाडेकर, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, बाळासाहेब भागवत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माघार घेतलेल्या उमेदवारांपैकी आरपीआय आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे, शिवसेनेचे जितेंद्र ननावरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक काळूराम पवार, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, प्रल्हाद कांबळे, हेमंत मोरे, सुरेश लोंढे, रीता सोनवणे, चंद्रकांत लोंढे आदींसह माघार घेतलेले इतर उमेदवार उपस्थित होते. यावेळी योगेश बहल म्हणाले की, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी परशुराम वाडेकर यांना फोन केला, त्यांच्यामार्फत चंद्रकांता सोनकांबळे यांच्याशी बोलणे झाले. भविष्यात त्यांना आरपीआयच्या कोट्यातून एखादे महामंडळ किंवा शासकीय पदावर घेण्यासाठी प्रयत्न करू असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी परशुराम वाडेकर यांच्यामार्फत सोनकांबळे यांना सांगितले आहे. तसेच मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सोनकांबळे यांच्याशी बोलणे करून दिले. आठवले साहेब आणि अजितदादा पवार यांच्या शब्दाला मान देऊन सोनकांबळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे आमदार अण्णा बनसोडे यांचा मार्ग आता सुखर झाला आहे. परशुराम वाडेकर म्हणाले की, आरपीआय आठवले गटाने या विधानसभा निवडणुकीत १२ जागा मागितल्या होत्या, गेली १५ वर्षे आम्ही महायुतीत आहोत. २०१४ च्या निवडणुकीत चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरी मतदारसंघातून ४७ हजार मते घेतली होती. यावेळी ही आम्ही वाट पाहिली, मात्र मतदारसंघ आरपीआयच्या वाट्याला न आल्याने आमचा रुसवा संपला आहे. आता खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. सोनकांबळे यांना महामंडळ किंवा महिला आयोगासारखे आरपीआय आठवले गटाच्या कोट्याला येणारे महामंडळ देऊ असे आश्वासन देण्यात आले आहे. तिन्ही मतदारसंघात आम्ही काम करू. अपक्ष म्हणून अर्ज भरताना चंद्रकांता सोनकांबळे यांनी दिलेला आरपीआय आठवले गटाचा राजीनामा नामंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या की, सन २०१४ च्या निवडणुकीत शिलाई मशीन हे चिन्ह असतानाही मला ५० हजार मते आरपीआय च्या तिकिटावर मिळाली होती. २०१९ मध्ये सेटिंग मेंबरमुळे मला तिकीट नाकारण्यात आले. आताही विद्यमान आमदारांमुळे मला तिकीट मिळाले नाही मग संधी कधी मिळणार या भावनेतून मी अर्ज भरला होता. मात्र रामदास आठवले साहेब यांनी आपल्या उमेदवारीने महायुतीचा पराभव होईल त्यात अर्थ नाही असे सांगितले. महामंडळासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे आपण माघार घेतल्याचे सोनकांबळे यांनी सांगितले. आमदार आण्णा बनसोडे म्हणाले की, महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रचार यंत्रणा राबवली जाईल. इच्छुक राहण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो, मात्र उमेदवारी एकालाच भेटते. माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, काळूराम पवार यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधून दिला. योगेश बहल यांची शिष्टाई यशस्वी ठरली असून आता सोनकांबळे, ननावरे, पवार यांच्यासह माघार घेणाऱ्या सर्व इच्छुकांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र काम करणार आहोत. जितेंद्र ननावरे म्हणाले की, महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी माघार घेतली आहे. बाबा कांबळे म्हणाले की, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन महायुतीने दिले आहे. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले गेले ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे आपण माघार घेत आहे. काळूराम पवार म्हणाले की, उमेदवारी न मिळाल्याचे मनात दुःख असते पण शेवटी पक्ष मोठा आहे त्यामुळे आम्ही एकत्रित रित्या निवडणुकीला सामोरे जाऊ व जिंकू. समन्वयक सदाशिव खाडे म्हणाले की, महायुतीचा मुख्यमंत्री करण्यासाठी आ. अण्णा बनसोडे यांच्या रूपाने आपल्याला सुभेदार विधानसभेत पाठवायचा आहे.यावेळी आरपीआयचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश निकाळजे, माजी नगरसेवक संतोष लोंढे, अंकुश कानडी, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष फझल शेख, जेष्ठ कार्यकर्ते संदीपान झोंबाडे, धर्मेंद्र उर्फ बबलू सोनकर आदींसह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.————————————- उद्या मंगळवारी महायुतीची बैठक रागा पॅलेस येथे होणार असल्याची माहिती योगेश बहल यांनी दिली.

Views: 114
Previous Post

आमदार महेश लांडगेंच्या विजयासाठी महायुतीची ‘‘वज्रमूठ’’

Next Post

पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेसच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह विविध घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाची वज्रमुठ बांधत राहुल कलाटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला. आकुर्डी येथील हॉटेल किरीयाडमध्ये हा स्नेह मेळावा संपन्न झाला.

Related Posts

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
Next Post
पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेसच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह विविध घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाची वज्रमुठ बांधत राहुल कलाटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला. आकुर्डी येथील हॉटेल किरीयाडमध्ये हा स्नेह मेळावा संपन्न झाला.

पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेसच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह विविध घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाची वज्रमुठ बांधत राहुल कलाटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला. आकुर्डी येथील हॉटेल किरीयाडमध्ये हा स्नेह मेळावा संपन्न झाला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!