पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभागातर्फे दिपावली पहाट – २०२२ चे आयोजनप्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार कार्यक्रम; उपायुक्त विठठल जोशी यांची माहितीपिंपरी, दि. १८ ऑक्टोबर २०२२: पिंपरी चिंचवड महानगरपालिका व संगीत अकादमी (क्रीडा विभाग) यांच्यावतीने शहरवासियांसाठी दिपावली पहाट – २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ५:३० वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह याठिकाणी कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती क्रीडा विभागाचे उपायुक्त विठठल जोशी यांनी दिली आहे.दिपावली पहाट कार्यक्रमामध्ये सुप्रसिध्द शास्त्रीय गायक पंडित जयतीर्थ मेऊंडी व सुप्रसिध्द गायिका विदुषी गौरी पाठारे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार असून सुप्रसिध्दी बासरी वादक पंडित रोणु मुजुमदार हे बासरी वादनाचा कार्यक्रम सादर करतील.कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह (भा.प्र.से) यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. या कार्यक्रमासाठी खासदार श्री. श्रीरंग उर्फ आप्पा बारणे (मावळ लोकसभा), खासदार श्रीम. सुप्रिया सुळे (बारामती लोकसभा), खासदार डॉ. अमोल कोल्हे (शिरूर लोकसभा), आमदार श्री. लक्ष्मण जगताप (चिंचवड, विधानसभा), आमदार श्री. महेश लांडगे (भोसरी, विधानसभा), आमदार श्री. अण्णा बनसोडे (पिंपरी विधानसभा), आमदार श्री. संग्राम थोपटे, विधान परिषद सदस्या श्रीम. उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नक्षत्रांची उधळण आणि नवस्वप्नांची पखरण करण्याकरिता पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी दिपावली पहाट कार्यक्रमासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन उपायुक्त विठठल जोशी यांनी केले आहे.