सोलापूर प्रतीनीधी कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेस अडवल्यामुळे border dispute सीमाभागात तणाव वाढला असून, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची तीव’ता वाढली आहे.महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये बसला काळे फासण्याच्या घटना घडल्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमांवर बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी आणि कर्नाटकातून येणारी एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेस सीमेवर अडवल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. यानंतर महाराष्ट्राकडूनही कर्नाटकच्या बसेस बंद करण्यात आल्या. दरम्यान, वातावरण निवळेपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती आहे.सोलापूर-गुलबर्गा मार्गावर हिरोळीजवळ तीन आणि दुधनीजवळ सिन्नूर border dispute सीमेवर दोन बसेस रोखण्यात आल्या. त्यात 82 प्रवासी होते. प्रवाशांना खाली उतरवून देण्यात आले. यामुळे त्यांची गैरसोय झाली. दरम्यान, प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्रातील लोकांनीही कर्नाटकच्या बसेस रोखून धरल्या. यामुळे सीमाभागात तणाव निर्माण झाला. कर्नाटकच्या बसला दौंडमध्ये शाई फासण्यात आल्यानंतर कलबुर्गीमध्ये महाराष्ट्राच्या बसला काळे फासण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत तालुक्यातील गावांची मागणी केल्यामुळे दोन्ही राज्यांतील वाद वाढताना दिसत आहे.