आपले शहर

खंडणीविरोधी पथकाची धडक कारवाई; रेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त!

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीविरुद्ध धडक कारवाई करत ५० हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्तूल जप्त केले आहे. ही कारवाई २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दक्षिण चाकण परिसरात करण्यात आली.पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांच्या आदेशानुसार खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड आणि पथकातील कर्मचारी चाकण परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान पथकाला एका व्यक्तीकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्तूल जप्त करण्यात आले.

पोलीस चौकशीत संबंधित आरोपीने हे पिस्तूल इतर व्यक्तीकडून विकत घेतल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात संबंधित व्यक्तींविरुद्ध दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचेही पोलिसांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार व सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड आणि पथकातील अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!