भापकर

दुर्गा देवी टेकडी ऐवजी बंद वॉटर पार्क अथवा वेस्ट टु एनर्जी प्रकल्पाच्या जागेवर नियोजित पाण्याची टाकी उभारून दुर्गा देवी टेकडीवरील २२७ वृक्ष वाचवावेत….

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दुर्गा टेकडी हि या शहरांतील नागरिकांसाठी निसर्गाचे वरदान आहे. आम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये असताना विद्यार्थी म्हणून त्यावेळी आम्ही संपूर्ण दुर्गा टेकडीवर महापालिकेने राबवलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांमध्ये तीन दिवस सहभाग घेतला होता.
आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागातील नागरिक,महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी हे दुर्गादेवी टेकडीवर पहाटे पाच वाजे पासून सकाळी साडेनऊ दहा वाजे. पर्यंत वाकिंग व योगा, इतर व्यायामासाठी येत असतात. पुरेशा ऑक्सिजन व शुद्ध हवा यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी या वृक्षवल्लीची खूप मदत होते.

दुर्गा टेकडी ही पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या हरित क्षेत्रापैकी एक आहे. वाढते शहरीकरण,प्रदूषण आणि कमी होत असलेली वृक्षसंपदा यामुळे शहरातील पर्यावरण समतोल बिघडत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाने या दुर्गा टेकडीवर पाण्याची टाकी बांधण्याकरता २२७ वृक्षांवर कुऱ्हाड चालवून हे वृक्ष तोडण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाच्या विरोधात आज आम्ही सकाळी आठ ते दहा या वेळेत नोटीस लावलेल्या झाडांना मिठी मारून “चिपको आंदोलन”आंदोलन केले. झाडे वाचवा ऑक्सिजन वाचवा, या प्रशासनाचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.


यावेळी मारुती भापकर यांनी प्रशासनाने हरकती व सूचनांची नोटीस लावताना चापलुसी केली. जेणेकरून हरकती व सूचना दाखल करण्याकरता नागरिकांना पुरेसा वेळच मिळू नये याची काळजी घेतली. नियोजित पाण्याची टाकी दुर्गा टेकडी ऐवजी बंद असणाऱ्या वाटर पार्क अथवा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या जागेवर उंच पाण्याची टाकी उभारावी अशी मागणी केली.
भापकर पुढे म्हणाले गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ताधारी पक्ष आर्थिक लाभाच्या बकासुरी अपेक्षेने वृक्षतोडीला प्राधान्य देऊन पर्यावरणाचा ऱ्हास करीतआहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत लोणावळा ते पन्हाळा ५९ जलविद्युत प्रकल्पांना केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी वन विभागाची सहाशे एकर जागा गुजरातचे उद्योगपतीला दिले आहे. या एका प्रकल्पासाठी ३४हजार ६०० वृक्षतोडीला मान्यता दिली आहे. मावळात अशाच एका प्रकल्पाला ७० हजार वृक्षतोडीला मान्यता दिली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आदाणीच्या अशाच एका प्रकल्पाला लाखो वृक्ष तोडण्याची परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरणाचे हृदय असणाऱ्या व ऑक्सिजन पार्क असणार्या दुर्गा टेकडी येथील २२७ वृक्ष तोडण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. प्रत्यक्षात यापेक्षा पाण्याच्या टाकीसाठी यापेक्षा अधिकची वृक्षतोड होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात व ही वृक्ष संपदा वाचवावी. या हरकती व सूचना यांचा फार्स करून जर वृक्षतोडीला प्रशासन प्राधान्य देणारा असेल तर शहरातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना संस्था व दुर्गा टेकडीवरील दररोज येणारे ज्येष्ठ नागरिक, युवक युवती, महिला व विद्यार्थी यांना एकत्रित करून मोठे जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा भापकर यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी भगवान पठारे, निलेश शिंदे, जितेंद्र चावडा, कोळी मामा,बाबा मोहिते, रोकडे गुरुजी, प्रशांत मातेरे भावेश पटेल सह मोठ्या संख्येने विद्यार्थी व महिला या चिपको आंदोलनात सहभागी झाल्या होत्या


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!