आपले शहर

समन्वय आणि मायक्रो प्लॅनिंगच्या बळावर निवडणुकीची तयारी : आमदार शंकर जगताप

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची आढावा बैठक

पिंपरी १८ ऑक्टोबर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संपर्क, प्रचाराचे नियोजन आणि संघटनात्मक समन्वयावर विशेष भर देण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावर जबाबदाऱ्यांचे नियोजन करून निवडणुकीच्या तयारीचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ करण्यात येत आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी (दि. १८) केले.पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रहाटणी येथील विमल गार्डनमध्ये मतदारसंघातील भाजपा नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा व समन्वय बैठक झाली. यावेळी जगताप यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी संघटनेतील सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याची गरज जगताप यांनी अधोरेखित केली. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध संपर्कावर भर देत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि बूथस्तरावरील कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button